Shivsena: ठाकरे गटाला धक्का! अडीच लाख प्रतिज्ञापत्राबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा ठाकरे गटाला मोठा फटका
Shivsena: ठाकरे गटाला धक्का! अडीच लाख प्रतिज्ञापत्राबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

खरी शिवसेना कोणाची या वादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने 11 लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे सादर केली. 11 लाखापैकी दोन ते अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाच्या विहित नमुन्यात नसल्याने निरुपयोगी ठरली आहेत. तरीदेखील साडेआठ लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला यश मिळाले आहे.

आमचीच शिवसेना खरी असा दावा सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांच्या मार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुण्यामध्येच ही प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विहीत नमुण्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर न करण्यात आल्यानं ही प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहेत.

ठाकरे गटाने साडेआठ लाख सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे आयोगाच्या दिल्ली कार्यालयात पाठविली आहेत. प्रत्यक्षात ठाकरे गटाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे तयार होती. मात्र आयोगाने ती बाद ठरवली असती म्हणून ही प्रतिज्ञापत्रे ठाकरे गटाने आयोगाला पाठविलीच नाहीत.

शिंदे आणि आमदारांनी बंड केल्यानंतर खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद सुरू झाला. दोन्ही गटाकडून नाव आणि चिन्ह यावर दावा करण्यात आल्यामुळे निवडणूक आयोगाकडून चिन्हासह नाव देखील गोठवण्यात आलं. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून शिवसेना ही आमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सदार करण्यात येत आहेत. त्यातच ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com