कारखानदारांना मोठा धक्का! उसाचा रस, सिरप, साखरेपासूनच्या इथेनॉलनिर्मितीवर केंद्रानं घातली बंदी

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कारखानदारांसह ऊस उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे.
Ethanol Project Sugar Factory
Ethanol Project Sugar Factoryesakal
Summary

सध्या सिरप, साखर व उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक प्रति लिटर ६५ रुपये ६१ पैसे दर आहे.

कोल्हापूर : देशात साखरटंचाई (Sugar) होईल, या कारणासाठी उसाचा रस, सिरप आणि साखरेपासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलनिर्मितीवर केंद्र सरकारने (Central Government) बंदी घातली आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात नव्याने उभारलेले इथेनॉल प्रकल्प (Ethanol Project) अडचणीत येऊन इथेनॉलनिर्मितीला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कारखानदारांसह ऊस उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. देशात आणि विविध राज्यांमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. यंदाचा ऊस गळीत हंगामा १२० दिवसांऐवजी ८० ते ९० दिवसच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे साखर उत्पादन घटेल. या अंदाजावर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Ethanol Project Sugar Factory
Koyna Dam : कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यात अडचण नाही, पण..; मंत्री देसाईंनी आमदार गाडगीळांना सांगितलं 'हे' कारण

कारखान्यांना ‘बी’ आणि ‘सी’ मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. सध्या सिरप, साखर व उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक प्रति लिटर ६५ रुपये ६१ पैसे दर आहे. मात्र, याच इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याने साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्पासाठी खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची परतफेड कशी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ‘बी’ हेवी मोलॅसिस पासून मिळणाऱ्या इथेनॉलला प्रति लिटर ६० रुपये ७३ पैसे, तर ‘सी’ हेवी मोलॅसिस पासून मिळणाऱ्या इथेनॉलला ४९ रुपये ४१ पैसे दर मिळतो.

Ethanol Project Sugar Factory
Loksabha Election : अजितदादांचा 'या' मतदारसंघावर दावा; 'महायुती'त मिठाचा खडा पडण्याची शक्यता, जागा वाटपावरून वाद

केंद्राच्या निर्णयामुळे इथेनॉलनिर्मितीला खीळ बसणार आहे. साखरेला दर नसल्याने इथेनॉलपासून नफा मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कारखान्यांना या निर्णयाचा फटका बसेल, असे वाटते.

-पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com