राज यांना केंद्र सुरक्षा पुरवणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

central government will provide security to mns president raj thackeray mumbai

राज यांना केंद्र सुरक्षा पुरवणार?

मुंबई : मशिदींवरील भोंगे काढण्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्र सरकारतर्फे सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता आहे. किरिट सोमय्या आणि खासदार नवनीत राणानंतर राज यांनाही केंद्राची सुरक्षा मिळू शकेल. राज ठाकरे यांना सुरक्षा पुरविण्याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला पत्र लिहून सुरक्षा पुरविण्याची मागणी केली होती.या पत्राकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यानंतर आता केंद्र सरकारच राज यांना सुरक्षा पुरविणार असल्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार

‘‘ राज ठाकरे यांना काही संघटनांकडून धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवावी आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही ७ फेब्रुवारी केली होती. याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याने आता पुन्हा आम्ही राज्य सरकारला पत्र लिहिणार आहोत. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांना देखील सुरक्षा पुरवावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे पुन्हा एकदा करणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील पत्र लिहिणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

अयोध्या दौऱ्यासाठी तयारी सुरु

मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसेला संजीवनी मिळाली आहे. आगामी मुंबई महापालिका आणि इतर पालिका निवडणुकींच्यादृष्टीकोनातून हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून यासाठी मनसेने तयारी सुरु केली आहे. या दौऱ्याची रूपरेषा आखण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मंगळवारी (ता.१९) विशेष बैठक बोलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: Central Government Will Provide Security To Mns President Raj Thackeray Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top