मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.
rain
rainesakal
Summary

राज्यात सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

पुणे - मॉन्सूनच्या पावसाने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भात जोर धरला आहे. पूर्व किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या विदर्भाकडे सरकल्याने विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या दमदार सरींनी हजेरी लावली आहे. मंगळवारी (ता. १९) पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

राज्यात सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अतिवृष्टी झाल्याने विदर्भात पूरस्थिती कायम आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने हजेरी लावली होती. एकीकडे पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता विदर्भाकडे सरकले असून दुसरीकडे मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असल्याने राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण उत्तर मराठवाड्यासह विदर्भात ढग दाटले.

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या पश्चिमेकडे ओमानकडे सरकत आहे. या ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून उत्तर ओडिशा आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता विदर्भाकडे सरकले आहे. त्यात मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. तर गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत असलेला समांतर कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. परिणामी पश्‍चिम विदर्भात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. १९) पावसाचे अलर्ट

ऑरेंज अलर्ट - अमरावती, अकोला

यलो अलर्ट - रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, बुलडाणा, वर्धा, औरंगाबाद, जालना, यवतमाळ, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

राज्यातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये) -

  • नगर - ६

  • जळगाव - २३

  • कोल्हापूर - ३

  • महाबळेश्‍वर - १६

  • नाशिक - १८

  • सातारा - ०.२

  • मुंबई - ०.६

  • सांताक्रूझ - ५

  • अलिबाग - ३

  • रत्नागिरी - ०.७

  • डहाणू - ०.४

  • परभणी - ५

  • अकोला - ३६

  • अमरावती - ५२

  • बुलडाणा - १३

  • ब्रम्हपूरी - २

  • चंद्रपूर - २

  • नागपूर - १०

  • वर्धा - ७५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com