
मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्या आल्याने राज्यभरातील विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नागपूर, कोल्हापूर आणि मडगाव या मार्गांवर एकूण १८ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांना आरक्षणाची अतिरिक्त संधी मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ होणार आहे.