

Ganeshotsav Special Train
ESakal
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-मडगावदरम्यान चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मडगाव आणि परतीच्या मार्गावर या विशेष गाड्यांच्या दोन-दोन फेऱ्या होणार आहेत.