Solapur ZP Budget: सोलापूर जिल्हा परिषद उभारणार शॉपिंग मॉल! मांडले ४८ कोटींचे अंदाजपत्रक

जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात आशा क्‍लिनिक, शाळांना सोलरसह अमृत रसोई व अपंगांसाठी ई-रिक्षा या नव्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यासाठी अनुक्रमे २४ लाख, दोन कोटी ५० लाख व ४९ लाखांची तरतूद केली आहे. तसेच ग्रामीण भागातील मुली, मागास व अपंग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी ५० लाखांची तरतूद केली आहे.
Solapur ZP Budget: सोलापूर जिल्हा परिषद उभारणार शॉपिंग मॉल! मांडले ४८ कोटींचे अंदाजपत्रक

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात आशा क्‍लिनिक, शाळांना सोलरसह अमृत रसोई व अपंगांसाठी ई-रिक्षा या नव्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यासाठी अनुक्रमे २४ लाख, दोन कोटी ५० लाख व ४९ लाखांची तरतूद केली आहे. तसेच ग्रामीण भागातील मुली, मागास व अपंग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी ५० लाखांची तरतूद केली आहे.

मॉडेल आरोग्य केंद्र, मॉडेल अंगणवाडी, खडूमुक्त अभियान, सायन्स वॉल यासाठीची तरतूद केल्याने आरोग्य व शिक्षणासाठीच्या पायाभूत, अत्याधुनिक सुविधांसह आर्थिक बाबीवर भर दिला आहे. सोमवारी (ता. ४) यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सन २०२४ -२५ या वर्षाचे ४८ कोटी ११ लाखांचे अंदाजपत्रक सादर केले.

सन २०२३ -२४ चे मूळ अंदाजपत्रक ४५०६. ६८ लाख होते. त्यात यंदाच्या अंदाजपत्रकात ३०४.९९ लाखांची वाढ करण्यात आली. पाच कोटी ३४ लाखांची शिल्लक आहे. याप्रसंगी मुख्य व वित्त लेखाधिकारी मिनाक्षी वाकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, अमोल जाधव, इशाधीन शेळकंदे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

बजेटमधील ठळक बाबी...

  • आरोग्य विभागासाठी ३९१.३१ लाखांची तरतूद केली असून, आशा क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत सेविकांना २४ लाखांच्या निधीतून किट देण्यात येणार आहे. यात रक्तदाब, रक्तातील साखर मोजण्याचे व वाफ देण्याचे यंत्र, वजनकाटा, बँडेज, अंग शेकायची पिशवी आदींचा समावेश आहे.

  • स्पर्धा परीक्षेत पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींसाठी १५, मागास विद्यार्थ्यांसाठी १५, अपंगांसाठी २० लाख अशी ५० लाखांची तरतूद केली आहे.

  • शाळांना क्रीडा साहित्य पुरविण्यात १० लाखांची वाढ करून २० लाख, खडूमुक्त शाळा, सायन्स वॉलसह शैक्षणिक साहित्यासाठी ७५ लाख, बाकड्यांसाठी २० लाख, अपंगांना ई- रिक्षासाठी ४९ लाखांची तरतूद केली आहे.

  • शिष्यवृत्ती शुल्क भरणे, विद्यार्थ्यांसाठीची सायकल बँक योजनाही सुरू राहणार आहे. तसेच महिलांच्या मागणीनुसार वेगवेगळे साहित्य पुरविण्यासाठी ८० लाखांची तर पशुपालकांना मुरघास तयार करण्यासाठी पहिल्यांदाच १० लाखांची तरतूद केली आहे.

विभाग, योजनानिहाय तरतूद

  • (कृषी)

  • कृषी अभियांत्रिकी औजारे १ कोटी

  • पशुपालकांसाठी औजारे १ कोटी १० लाख

  • (पशुसंवर्धन)

  • शेळ्या, बोकड वाटप ४० लाख

  • मिल्किंग मशिन ३० लाख

  • (आरोग्य)

  • आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण : ३० लाख

  • असाध्य आजारांवर उपचार : २० लाख

  • औषध खरेदी : १ कोटी

  • (समाजकल्याण)

  • विद्युतपंप पुरविणे : ३० लाख

  • विद्यार्थ्यांना सायकल : २० लाख

  • शेळीपालन गट : ३० लाख

  • संगणक प्रशिक्षण : ४० लाख

  • टॅली प्रशिक्षण : २५ लाख

  • अपंगांना शेळीपालन गट : ४२ लाख

  • दिव्यांग शिक्षण : २५ लाख

  • (महिला व बालकल्याण)

  • अंगणवाड्यांना साहित्य पुरविणे ८० लाख

  • (बांधकाम)

  • रस्ते, इतर विकास ४ कोटी

मालमत्ता शोधण्यासाठी एक महिन्याची मुदत

उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांचा शोध लागत नाही. त्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षांपासून या विषयावर चर्चा सुरू आहे. सर्वच विभागांना आपल्या मालमत्तांचा शोध घेऊन माहिती देण्यासाठी ही शेवटचा इशारा आहे. एका महिन्यात ही माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रादेशिक योजनांचे वीजबिल भरणार

ग्रामीण पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी दोन कोटींची तरतूद केली आहे. त्यातून वीजबिल थकीत असलेल्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांचे बिल भरण्यात येणार आहे. लघु नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ४० लाख रुपये ठेवण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी शॉपिंग मॉलचे नियोजन

जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी व्यापारी गाळे बांधण्यात येणार आहेत. त्याकरिता ५० लाखांची तरतूद केली आहे. तसे गोदाम भाड्याने देण्यात येईल. त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या जागेवर शॉपिंग मॉल उभारण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकाम, दुरुस्तीसाठी एक कोटी ५० लाखांची तरतूद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com