esakal | राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ‘सीईटी’ परीक्षा बुधवारपासून
sakal

बोलून बातमी शोधा

MHT-CET

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ‘सीईटी’ परीक्षा बुधवारपासून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, एमसीएम, एमबीए, एम.आर्च अशा विविध १५ व्यावसायिक अभ्यासक्रमांची ‘सीईटी’ परीक्षा बुधवारपासून (ता.१५) टप्प्या-टप्प्याने सुरू होत आहे. यामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे.

राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी कक्षाकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. राज्यभरातील विविध संस्थांमधील सुमारे चार लाख जागांवरील प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेतल्या जातात. यंदा १५ विविध अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’परीक्षेसाठी सात लाख ७४ हजार ८६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

हेही वाचा: यॉर्कर किंग लसीथ मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी अभ्यासक्रमांची ‘सीईटी’ परीक्षा २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षेचा तपशील :

व्यवसाय अभ्यासक्रम : परीक्षेचे नाव : परीक्षेची तारीख : नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

  • एमसीए : एमएएच-एमसीए-सीईटी : १५ सप्टेंबर : २५,२०८

  • एम.एचएमसीटी : एमएएच-ए.एचएमसीटी : १५ सप्टेंबर : ५०

  • एम. आर्च : एमएएच-एम.आर्च-सीईटी : १५ सप्टेंबर : १,०९५

  • एम.पी.एड : एमएएच-एम.पी.एड-सीईटी : १५ सप्टेंबर : २,०३९

  • एम.पी.एड : एमएएच-एम.पी.एड फिजीकल टेस्ट (ऑफलाइन) : १६ ते १८ सप्टेंबर :---

  • बीए/बी.एस्सी/बी.एड : एमएएच-बीए/बी.एस्सी- बी.एड : १५ सप्टेंबर :  ३,९४७

  • एमबीए/एमएमएस : एमएएच-एमबीए/एमएमएस सीईटी : १६ ते १८ सप्टेंबर : १,३२,१९०

loading image
go to top