आरक्षण संपवण्याचा डाव; छगन भुजबळ यांचा सरकारवर हल्लाबोल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 जुलै 2018

भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा आरक्षण संपवणे हा अजेंडा असून राज्य सरकारने त्यासाठीचे निर्णय घेतले आहेत. असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते छगन  भुजबळ यांनी आज केला. मात्र सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देऊ नका असे आवाहन करत मोदी सरकारच्या धोरणावर भुजबळ यांनी जोरदार टीका केली. मुंबई राष्ट्रवादी कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. 

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा आरक्षण संपवणे हा अजेंडा असून राज्य सरकारने त्यासाठीचे निर्णय घेतले आहेत. असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते छगन  भुजबळ यांनी आज केला. मात्र सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देऊ नका असे आवाहन करत मोदी सरकारच्या धोरणावर भुजबळ यांनी जोरदार टीका केली. मुंबई राष्ट्रवादी कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. 

लोकांच्या हितासाठी ताठ मानेनं उभे राहा असा सल्ला देताना ते म्हणाले की, आंदोलन करायला घाबरू नका. अटक होईल म्हणून मागे हटू नका. मला स्वत:ला अनेक आंदोलनांमध्ये अटक झाली पण मी डगमगलो नाही. लोकांसाठी झोकून द्या. असे भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. दरवेळी कायदा हातात घेवूनच आंदोलनं केले पाहिजे असे नाही. मात्र ‘घी सिधी उँगलीसे नहीं निकले तो उँगली टेढी करनी चाहिये’ हे सूत्र लक्षात ठेवा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका करताना मुंबईचं महत्व कमी करण्याचा डाव मोदी यांचा असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. सध्या सर्व काही गुजरातलाच समोर करून निर्णय होत आहेत. परदेशी पाहुणे पण गुजरातलाच घेवून जात आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे ? असा सवाल करत मुंबईतील सर्व व्यापारी केंद्र गुजरातला कशी जातील यासाठी षडयंत्र सुरू असल्याची टीका भुजबळ यांनी केली.

Web Title: chagan bhjbhal criticise on government on reservation point