छगन भुजबळ यांची विधानभवनात ‘एन्ट्री’...! 

सोमवार, 9 जुलै 2018

विधानभवन परिसरात भुजबळ आल्यानंतर राष्ट्रवादीसह सत्ताधारी आमदार आणि मंत्री देखील त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. सोबतच त्यांचे स्वागतही करत होते.

नागपूर : महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी जामिनावर असलेल्या छगन भुजबळ यांची आज विधानभवनात ‘एन्ट्री’ झाली. भुजबळ येणार म्हणून सर्वच वाहिन्यांचे कॅमेरे रोखून होते. आतापर्यंत कोणत्याही नेत्याच्या आगमनासाठी अशी उत्सुकता नव्हती.

अडीच वर्षांनंतर भुजबळ पहिल्यांदाच विधानसभेत उपस्थित राहण्यासाठी येत होते. भुजबळ यांच्या या पुनरागमनाने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. भुजबळ यांच्या स्वागताला प्रवेशद्वारावरच राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. 

विधानभवन परिसरात भुजबळ आल्यानंतर राष्ट्रवादीसह सत्ताधारी आमदार आणि मंत्री देखील त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. सोबतच त्यांचे स्वागतही करत होते.

Web Title: Chagan Bhujbal in Nagpur Monsoon session