सायबर क्राइमचे गृहखात्यापुढे आव्हान 

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई - पारंपरिक गुन्ह्यांपेक्षा आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सायबर क्राइम हे गृहखात्यापुढील गंभीर आव्हान झाले आहे. मागील पाच वर्षांत राज्यात सुमारे बारा हजार सायबर गुन्हे नोंदले गेले असून, यांत पाच हजार जणांना अटक झाली आहे. मागील पाच वर्षांत गुन्ह्यांत आठपटीने वाढ झाली आहे. 

मुंबई - पारंपरिक गुन्ह्यांपेक्षा आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सायबर क्राइम हे गृहखात्यापुढील गंभीर आव्हान झाले आहे. मागील पाच वर्षांत राज्यात सुमारे बारा हजार सायबर गुन्हे नोंदले गेले असून, यांत पाच हजार जणांना अटक झाली आहे. मागील पाच वर्षांत गुन्ह्यांत आठपटीने वाढ झाली आहे. 

माहिती व तंत्रज्ञान कायदा- 2000 सुधारित (2008) अंतर्गत सायबर गुन्ह्यांची नोंद केली जाते. चोरी, मारामारी, खून, फसवणूक आदी पारंपरिक गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचे स्वरूप वेगळे असते. यामध्ये तपासासाठी वेगळी यंत्रणा लागते. बऱ्याचवेळा आरोपी परदेशातून कारवाया करीत असतो. अशावेळी त्याचा माग काढणे जिकिरीचे असते. सायबर क्राइम हा पांढरपेशी गुन्हा आजमितीस गृहखात्यापुढील गंभीर आव्हान बनले आहे. राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरांत झाली आहे. ज्या ठिकाणी उद्योग व्यापार, आयटी पार्क, बॅंका यांचे जाळे विस्तारले आहे, अशा शहरांत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

बॅंकांमधून फसवणूक करून पैसे परस्पर वळवणे, ऑनलाइन पैसे काढणे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड क्‍लोन करून आर्थिक फसवणूक करणे, एटीएममध्ये स्कीमर लावणे, ऑनलाइन वधू-वर सूचक मंडळातील फसवणूक, व्हॉट्‌सऍप, फेसबुक साइटवरून चारित्र्यहनन, अश्‍लील फोटो, मेसेज पाठवणे, पॉर्न क्‍लिपिंग पाठवणे, तसेच ऑनलाइन नोकऱ्या देण्याच्या नावावरून फसवणूक आदी गुन्हे सायबर गुन्ह्यांच्या प्रकारात मोडतात. 

गृहखाते व पोलिसांचे उपाय  
- जनजागृतीचे कार्यक्रम 
- महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प 
- राज्यात 47 सायबर लॅब 
- 32 सायबर पोलिस ठाणी 
- "एमएच-सीईआरटी'ची उभारणी 

पाच वर्षांतील आकडेवारी 
- नोंद झालेले गुन्हे - 11,957 
- तपास पूर्ण झालेले गुन्हे - 4304 
- अटक झालेल्या आरोपींची संख्या - 5153 
- 2012मधील नोंद झालेले गुन्हे - 561 
- 2017 मध्ये नोंद झालेले गुन्हे - 4035 
- 2012 मध्ये तपास पूर्ण झालेले गुन्हे - 351 
- 2012 मध्ये अटक झालेले आरोपी - 407 
- 2017 मध्ये अटक झालेले अरोपी - 1367

Web Title: Challenge against cyber crime mumbai news