
Maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
भोपाळमधील एमपी नगर भागात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिव्यऋषी तिवारी यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिवारी आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी डीबी मॉलमध्ये गेले होते. रस्ता ओलांडताना त्यांनी एका खांबाला हात लावला; त्या खांबावर उघडी तार होती. यामुळे पती आणि पत्नी दोघांनाही विजेचा धक्का बसला.