कोकण, गोव्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

monson
monson

पुणे : कोकण, गोव्यातील काही ठिकाणी शनिवारी जोरदार पाऊस झाला. दरम्यान, येत्या ३० जूनपर्यंत कोकण, गोव्यासह विदर्भात विजांचा कडकडाट पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

monson
वाहतूक पोलिस नियम मोडणाऱ्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमांतून करणार कारवाई

पुणे शहरात शनिवारी अंशतः ढगाळ वातावरण होते. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच पुढील सहा दिवसात शहर व परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागांमध्ये पुढील सात ते आठ दिवस पावसाला ‘ब्रेक’ लागणार आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा मोसमी पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com