राज्यात पूर्व विदर्भ वगळता सर्व ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

राज्यात मंगळवारी (ता. ११) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली.
rain
rainsakal
Summary

राज्यात मंगळवारी (ता. ११) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली.

पुणे - एकीकडे मध्‍य भारतातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी हवामान पोषक झाले असताना दुसरीकडे, राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहेत. बुधवारी (ता. १२) राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्रासह पूर्व विदर्भ वगळता उर्वरित ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मंगळवारी (ता. ११) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली. दरम्यान पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सध्या केरळ व लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून या प्रणालीपासून कर्नाटक, मराठवाडा, विदर्भ ते मध्य प्रदेशापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा अद्याप सक्रिय आहे. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात पाऊस पडत आहे.

दरम्यान पोषक हवामानामुळे पुढील चार ते पाच दिवसात मध्य भारतातून मॉन्सून बाहेर पडण्‍यास सुरवात होऊ शकते. असे ही हवामानशास्त्र विभागने नमूद केले.

बुधवारी (ता. १२) या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट -

कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक, नगर, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, बुलडाणा, गडचिरोली, अमरावती, वाशीम, अकोला, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, लातूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com