‘निवार’ चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

बंगालच्या उपसागरात तमिळनाडू समुद्र किनारपट्टीजवळ घोंघावणाऱ्या ‘निवार’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होणार असून, काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

पुणे - बंगालच्या उपसागरात तमिळनाडू समुद्र किनारपट्टीजवळ घोंघावणाऱ्या ‘निवार’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होणार असून, काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बंगालच्या उपसागरात अतितीव्र ‘निवार’ चक्रीवादळ तयार झाले आहे. ते वेगाने पूर्व किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. यामुळे पूर्व किनारपट्टीवर ढगांची गर्दी झाली आहे. तेथे जोरदार पाऊस पडत आहे. हे चक्रीवादळ बुधवारी सकाळी कुड्डलोरपासून २९० किलोमीटर, पाँडेचेरीपासून ३०० किलोमीटरवर आहे. हे चक्रीवादळ तमिळनाडू आणि पाँडिचेरीच्या किनाऱ्याला धडकण्याची माहिती हवामान खात्याने दिली. हे चक्रीवादळ किनाऱ्याला धडकल्यानंतर पुढे कर्नाटकपर्यंत पुढे सरकत राहील. त्यानंतर ते शमेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

'अशा निवडणुका जिंकता येत नाहीत'; फडणवीसांचा अजित पवारांना टोला

या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर होईल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. यापूर्वी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या गती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागात नुकताच पाऊस पडला. त्यानंतर आता निवार चक्रीवादळामुळे येत्या गुरुवारी (ता. २६) आणि शुक्रवारी (ता. २७) मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडतील. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडी पडते. या वर्षी नोव्हेंबरच्या सुरवातीला पुण्यात ९ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला होता.

'कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही दबणारे नाही'; फडणवीसांचे महाविकास आघाडीला आव्हान

पुण्यात उद्या पावसाची शक्‍यता
शहर आणि परिसरात येत्या शुक्रवारी (ता. २७) तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला. पुढील तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. तसेच, किमान तापमानाचा पारा पुढील दोन दिवस १५ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असेही अंदाजात नमूद केले आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of rain in the state due to cyclone Niwar