ऑगस्टमध्ये शिक्षक भरतीची शक्यता धुसरच! जिल्हा परिषदांची बिंदू नामावली अंतिम; पण...

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची बिंदू नामावली आता अंतिम झाली आहे. पण, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा महासंघ, अनुसूचित जाती मागासवर्गीय संघटनांसह इतर काही संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून ती मागासवर्गीय कक्षाला पाठविली जाणार आहे.
schools
schoolssakal

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची बिंदू नामावली आता अंतिम झाली आहे. पण, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा महासंघ, अनुसूचित जाती मागासवर्गीय संघटनांसह इतर काही संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून ती मागासवर्गीय कक्षाला पाठविली जाणार आहे. तुर्तास सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये ७०० शिक्षकांची भरती होईल, अशी स्थिती आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील जवळपास ३० हजार शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेला बिंदू नामावली अंतिम करून त्यास मागासवर्गीय कक्षाची मंजुरी बंधनकारक आहे. त्यानंतर त्या त्या जिल्हा परिषदांनी पवित्र पोर्टलवर रिक्तपदे आणि भरायची पदे याची मागणी करणे अपेक्षित आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेची बिंदू नामावली अंतिम झाली आहे, पण एनटी-क, खुला प्रवर्गासह काही इतर मागास प्रवर्गातील बिंदू कमी झाल्याचा आक्षेप सामाजिक संघटनांनी घेतला आहे. त्यानुसार आता संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेतील. त्यानंतर बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाला मान्यतेसाठी पाठविली जाणार आहे. तरीदेखील, यंदा सोलापूर जिल्हा परिषद शाळांना ७०० नवे शिक्षक भेटतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

यंदा पुन्हा घटले १५० शिक्षक

२०१६ मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १२ हजार शिक्षक होते. पण, इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करताना अनेक तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा पिछाडीवरच राहिल्या. त्यामुळे मागील सहा वर्षांत सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षकांची संख्या साडेआठ हजारावर आली. यंदा संचमान्यता झाली, त्यावेळी पुन्हा १५० शिक्षक घटल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. सध्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांमध्ये आठ हजार २७८ शिक्षक कार्यरत आहेत.

जिल्हा परिषद शाळांची सद्य:स्थिती

  • एकूण शाळा

  • २,७९५

  • विद्यार्थी संख्या

  • १.९३ लाख

  • कार्यरत शिक्षक

  • ७,६००

  • अंदाजे रिक्तपदे

  • ६७८

ऑगस्टमध्ये भरतीची शक्यता धूसरच

१९९२ मध्ये एनटी हा संवर्ग ओबीसीमध्ये समाविष्ट होता. पण, १९९३ मध्ये हा संवर्ग स्वतंत्र (एनटी) झाला. त्यामुळे बिंदू नामावलीत त्यांचे बिंदू पूर्वीप्रमाणे धरले गेले नाहीत. त्याचा फटका एनटी प्रवर्गाला होतोय. दुसरीकडे खुल्या प्रवर्गालाही नवीन समीकरणांचा फटका बसतोय, असा आक्षेप सामाजिक संघटनांनी घेतला आहे. त्यावर आता सुनावणी होईल आणि त्यानंतर बिंदू नामावली अंतिम होऊन मागासवर्गीय कक्षाला सादर केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ऑगस्टमध्ये भरतीला सुरवात होण्याची शक्यता धूसरच मानली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com