
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन या निर्णयाची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला.