Shiv Sena : अमित शाह ठाकरेंवर टीका करत असतील तर ही चिड येणारी बाब; चंद्रकांत खैरेंचा पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Khaire vs Amit Shah

'शिवसेनेनं आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला.'

Shiv Sena : अमित शाह ठाकरेंवर टीका करत असतील तर ही चिड येणारी बाब; खैरेंचा पलटवार

Chandrakant Khaire vs Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा (Amit Shah in Mumbai) संपवून पुन्हा दिल्लीला रवाना झालेत. या दौऱ्यात अमित शाहांनी भाजपला मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मिशन 150 चं टार्गेट दिलंय.

'शिवसेनेनं (Shiv Sena) आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करू नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण यशस्वी होत नसतं. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे' असं म्हणत अमित शहा (Amit Shah) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय. यावर शिवसेनेच्या नेत्यांकडूनही शहांवर टीका करण्यात आलीय. शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शहांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

'मी त्या बैठकीला शिवसेना नेता म्हणून उपस्थित होतो. उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना बोलावलं होतं. तेव्हा एकेका पक्षाला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्यायचं असं ठरलं होतं, इतकं झाल्यानंतर देखील शहा ठाकरेंवर टीका करत असतील तर ही चिड येणारी बाब आहे,” अशा शब्दात खैरेंनी शहांचा समाचार घेतलाय. यावर भाजप नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया आली असून उद्धव ठाकरे आणि शहा यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना नेता म्हणून मी हजर होतो. हे खैरेंचं वक्तव्य म्हणजे संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळं रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतःचं महत्व वाढविण्याचा विनोदी प्रयत्न आहे, अशा शब्दात भाजपचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी खैरेंना टोला लगावलाय.