Chandrakant Khaire: "राग आल्यावर मी काहीही करू शकतो, आता गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार"

Chandrakant Khaire
Chandrakant KhaireSakal

औरंगाबाद : "गुलाबराव पाटलांनी खोके मिळायला लागले की तो आदित्य ठाकरेंवर बोलतो. पण मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही. मला राग आला तर मी काहीही करू शकतो, मी आता गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार" असं वक्तव्य औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

(Chandrakant Khaire on Gulabrao Patil)

दरम्यान, शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याचबरोबर गुवाहाटीला गेल्यावरचा एक अनुभवही पाटलांनी सांगितला होता. गुवाहाटीला गेल्यावर घरच्यांनी परत या परत या म्हणत फोन केले. पण आता आम्ही परत येत नाही, असं आम्ही ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अलिबाबा के चालिस चोर तसं आम्ही शिंदे बाबा के चालिस आमदार आहोत, असंही पाटील म्हणाले होते. त्यांनी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली टीका खैरे यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Chandrakant Khaire
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; जीवितहानी नाही

गुलाबराव पाटील यांच्यानंतर खासदार नवनीत राणा यांनीसुद्धा ठाकरेंवर निशाणा साधत, "तुम्ही जर उद्धव ठाकरे असाल तर मी सुद्धा राणा आहे, हिंमत असेल तर मैदानात या." असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर खैरे यांनी बोलताना म्हटलं की, ती बाई आम्हाला काय शिकवणार? ती पिक्चरमध्ये सिगरेट पिते, कसे कसे फोटो काढते, कपडे कशी घालते?" अन् ती आम्हाला काय शिकवणार? असं वक्तव्य खैरे यांनी केलं आहे.

Chandrakant Khaire
Ganeshotsav: पुण्यातील मंडळांना विसर्जनापुर्वी धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

दरम्यान, दोन्ही गटातील शाब्दिक वाद आता शिगेला पोहोचला असून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बुलढाण्यात संजय गायकवाडांच्या मतदारसंघात शिंदे गटाच्या आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर गायकवाड यांनी ठाकरे गटाला उघड धमकी दिली होती. त्यानंतर आता एकमेकांवर आरोप प्रात्यारोप केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com