'मनावर दगड ठेवून' विधानावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले, स्वीकारलचं पाहिजे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

'मनावर दगड ठेवून' विधानावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले, स्वीकारलचं पाहिजे...

सकाळ माध्यम समुहातर्फे आयोजित 'आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र' या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी चर्चेला पूर्णविराम दिला. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर भाजपने आयोजित केल्येल्या एका कार्यकारणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं होत, की "मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री पद शिंदेना दिले आहे".

या वक्तव्यामुळे भाजपला विरोधकांच्या टिकेला सामोरे जावे लागले होते. त्या वक्तव्यावर शुक्रवारी सकाळ समुहाच्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी खुलासा केला आहे. या कार्यक्रमा दरम्यान चंद्रकांत पाटील म्हणाले की पत्रकारीतेमध्ये असलेल्या गोंधळामुळे, संदर्भ न पकडता घेतलेले वाक्य, त्यामुळे राजकारणात मनस्ताप होत असल्याचे सांगितले, तर ते वक्तव्य कार्यकर्त्यांसाठी होतं.

हेही वाचा: Pune Rain: पुण्यात १० ठिकाणी झाडपडीच्या घटना, तर दोन ठिकाणी शॉर्टसर्किट

त्यांना सांगायचं होतं की झालं ते होवू द्या, पण मनावर दगड ठेवून पुढे चालत राहा, या वाक्याचा गैर अर्थ घेण्यात आल्याचा चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

भविष्यात शिंदे सेना की, उद्धव सेना असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले की, ज्या प्रकारची रिजीडीटी शिवसेनेमधून, म्हणजे भाजपसोबत युती केली नाही हा मुद्दा नाही. पण त्या रिजीडीटीतून भविष्यात काय निर्माण होईल याचा राजकीय अंदाज घेण्यात गेला. मात्र महाराष्ट्र, विकास, परंपरा, पुढच्या पिढीला काय देतो, या विचार न झाल्यामुळे आता तरी शिंदे सेना, असं चक्रावून टाकणारं उत्तर पाटील यांनी दिलं आहे.

Web Title: Chandrakant Patal Explanation Statement Stone Mind Should Accepted

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..