सत्तेसाठी गहाण टाकलात तुम्ही स्वाभिमान, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर टीका

'सत्तेसाठी कोण लाचार आहे आणि कोण नाही, हेही जनतेला दिसतयं.'
Chandrakant Patil And Uddhav Thackeray
Chandrakant Patil And Uddhav Thackeray

मुंबई : भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष दररोज एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज सोमवारी (ता.२१) ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पाटील म्हणतात, यू फाॅर उद्धव आणि यू- टर्न.. कलम ३७० रद्द झालं तेव्हा आमच्यासोबत सेलिब्रेशन, आता काश्मीरमध्ये जाऊन शिवसैनिकांच आंदोलन, हिंदुत्वातलं जाज्वलयं सोडलं, सोडला सगळा अभिमान, सत्तेसाठी गहाण टाकलात तुम्ही स्वाभिमान, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली. अजूनही वेळ गेलेली नाही. आता एमआयएम सारख्यांशी युती करणार का? असा सवाल पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केला. (Chandrakant Patil Attack On CM Uddhav Thackeray Over Power Politics)

Chandrakant Patil And Uddhav Thackeray
बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने फडणवीस पूर्ण करतील, नितेश राणेंचा दावा

एमआयएमने महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) ऑफर देणं हा भाजपाचा डाव असल्याचं ठाकरे म्हणतात. पण एमआयएमनं (MIM) ज्यांना ही ऑफर दिली आहे, त्यांच्या मांडीला मांडी लावूनचा सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळवल आहेत ना ? ते कायम ठेवण्यासाठी तुम्ही कसे धडपडताय, सत्तेसाठी कोण लाचार आहे आणि कोण नाही, हेही जनतेला दिसतयं.

Chandrakant Patil And Uddhav Thackeray
श्रीलंका संकटात ! नागरिकांना मिळेना पेट्रोल, कागद नसल्याने परीक्षा रद्द

सत्तेसाठीही एमआयएम सोबत जाणार नाही. झोपेतही एमआयएमशी युती नाही, अशी टाळीची वाक्य यापूर्वी कुठल्या पक्षांसाठी वापरली होती, ते जरा आठवा. तुम्ही टीका करत होता, ते काँग्रेस (Congress Party) आणि राष्ट्रवादीसारखे (NCP) पक्ष तिथेच आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जात स्वतःला त्यांच्या दावणीला बांधून घेतलयं, असा टोला पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com