esakal | राष्ट्रीय पातळीवर मनसेशी युतीबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil and Raj Thackeray

राष्ट्रीय पातळीवर मनसेशी युतीबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात...

sakal_logo
By
सुधीर काकडे

पालघरमध्ये भाजप-मनसेची युती झाल्यानंतर राज्यात येणाऱ्या काळात भाजप मनसे युती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राज ठाकरे आणि माझी भेट ही अचानक झाली होती, त्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नव्हती. एखाद्या ठिकाणी आवश्यकतेनुसार युती होत असते, त्यामुळे पालघरमध्ये झालेली युती ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मर्यादीत आहे. राष्ट्रीय पातळीवर युती व्हायला वरिष्ठ नेते चर्चा करतील असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर आरोप...

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. मराठा समाजाच आरक्षण याच सरकरमुळे गेले. तसेच इमपीरिकल डाटा गोळा करण्याचा काम केले जात नाही असे म्हणत त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतही हेच होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

हेही वाचा: ''मुख्यमंत्री साहेब...बोलघेवडेपणा बंद करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करा''

देगलूर-बिलोली पोटनिवडणूक...

चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार देगलूर-बिलोली मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ते येत्या 4 तारखेला देगलूरला जाणार आहे. एकूण १२ इच्छुकांची नावे समोर आली असून, मी त्याठीकाणी गेल्यावरत उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार अशी माहीतीही पाटील यांनी यावेळी दिली.

देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार...

अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे कसले करता.. सरकारने सरसकट मदत केली पाहिजे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येत्या २ तारखेला नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

loading image
go to top