चंद्रकांत पाटील सहा दिवसांसाठी महाराष्ट्राचे 'प्रभारी' नायक! 

सुनील पाटील
रविवार, 10 जून 2018

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांचा प्रभारी पदभार राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आला आहे. याशिवाय पाटील यांना दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे कृषीमंत्री पदही मिळण्याचे सुतोवाच आहेत. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाची विशेष भेट मिळाली असल्याचे कार्यकर्त्यांमूधन बोलले जात आहे.

आजपासून चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचे सहा दिवसांसाठी प्रभारी "नायक' म्हणून पदभार स्वीकारला आहे. शनिवारपर्यंत (ता. 16) ते प्रभारी म्हणून काम पाहतील. 
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर्षीच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणाकडूनही फुल, गुच्छ किंवा इतर भेट वस्तू स्विकारणार नसल्याचे जाहीर केले होते. याच गिफ्ट किंवा फुल-गुच्छांऐवजी कोल्हापूर जिल्ह्यात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यासाठी देगणी देण्याचे आवाहन केले होते. 

दरम्यान, जिल्ह्यात स्वच्छतागृहांचे काम जोमात सुरू आहे. यातच मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे प्रभारी मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे. कृषीमंत्रीपद मिळण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचे समोर येत आहे. महसूलमंत्री पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूरातील संभाजीनगर येथील निवास्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. वाढदिवसासह प्रभारी मुख्यमंत्रीपद मिळल्याने आणि कृषी मंत्रीपद मिळणार म्हणून शुभेच्छा देत आहेत. 

Web Title: Chandrakant Patil, the 'In-charge' of Maharashtra for six days is also likely to be the leader of the Agriculture