esakal | उदयनराजेंसह अन्य नेते काय पोरं आहेत काय?- चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजेंसह अन्य नेते काय पोरं आहेत काय?- चंद्रकांत पाटील

उदयनराजेंसह अनेक नेते काय पोरं आहेत काय? असा सवाल आज महाजनादेश यात्रेच्या मंचावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना केला आहे.

उदयनराजेंसह अन्य नेते काय पोरं आहेत काय?- चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

सोलापूर : उदयनराजेंसह अनेक नेते काय पोरं आहेत काय? असा सवाल आज महाजनादेश यात्रेच्या मंचावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना केला आहे.

भाजपच्या सोलापुरातील मेगाभरतीवर 'पाणी'

शरद पवार यांना प्रश्न विचारला होता की, नेत्यांसोबत नातेवाईकही सोडून चालले आहेत. त्यावर पत्रकार परिषदेत शरद पवार पत्रकारावर ओरडून बोलले. त्यावर अनेकांनी वेगवेगळे विश्लेषण त्यावर कोणीतरी म्हटले की, पोरांसारखे ज्या नेत्यांना सांभाळले ते नेते सोडून चालल्याने शरद पवारांचे संतुलन बिघडले.  चंद्रकांत पाटील म्हणाले की, उदयनराजे भोसले हे काय पोरगं आहेत काय? तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मग त्यांना काय म्हणाल? शिवेंद्रराजे, राणा जगजितसिंह, धनंजय महाडीक ही काय पोरं आहेत काय? असा प्रश्नही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.

मेगाभरतीत प्रवेश रखडलेल्या 'या' नेत्यांचे पुढे काय?

पाटील पुढे म्हणाले की, आमची परंपरा हिशोब द्यायची आहे. विरोधकांना काय कळणार आपण सत्ता उपभोगल्यावर त्याचा हिशोब द्यायचा असतो. पण तुम्ही तर ओरबडून खाण्यात माहीर आहात. अबकी बार 220 पार नाहीतर अबकी बार 288 पार असे म्हणण्याची वेळ आली असल्याचेही पाटील यांनी म्हटले. विरोधी पक्षाला उमेदवार मिळणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

loading image
go to top