भाजपच्या सोलापुरातील मेगा भरतीवर 'पाणी'

टीम ई-सकाळ
रविवार, 1 सप्टेंबर 2019

काही वेळापूर्वी सोलापुरात भाजपच्या सभेच्या ठिकाणी पावसाचा जोर वाढल्यामुळे  काही कार्यकर्त्यांनी मैदान सोडण्यास सुरुवात केली आहे. तर पुढच्या बाजूला कार्यकर्ते छत्री आणि रेनकोटच्या साह्याने तग धरून आहेत.

सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा भाजप प्रवेश होणार होता. पण, सभा स्थळी दुपारपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती.

म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय धनंजय महाडिकांनी घेतला

कार्यकर्ते मैदान सोडू लागले
दरम्यान, काही वेळापूर्वी सभेच्या ठिकाणी पावसाचा जोर वाढल्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मैदान सोडण्यास सुरुवात केली आहे. काहीवेळी मैदानातील कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण जोर वाढल्यानंतर मागील बाजूच्या कार्यकर्त्यांनी मैदान सोडण्यास सुरुवात केली. तर, पुढच्या बाजूला कार्यकर्ते छत्री आणि रेनकोटच्या साह्याने तग धरून आहेत.
अमित शहा यांच्या उपस्थितीत आज, कोल्हापूरचे धनंजय महाडिक, उस्मानाबादचे राणा जगजितसिंह आणि साताऱ्यातील जयकुमार गोरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या प्रवेशाच्या निमित्ताने तिन्ही नेत्यांनी शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला आहे. तिन्ही नेत्यांचे कट्टर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सोलापुरात सभेसाठी दाखल झाले आहेत. त्यांनी सभास्थळी हजेरी लावली आहे.

मेगा भरतीत केवळ ‘या’ तीनच नेत्यांचा होणार भाजप प्रवेश

मेगा भरतीत प्रवेश रखडलेल्या ‘त्या’ नेत्यांचं पुढं काय?

नेत्यांचे शक्तीप्रदर्शन
कोल्हापुरात धनंजय महाडिक यांचे काका महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीचे महापालिकेत नगरसेवक आहेत. या १९ नगरसेवकांसह महाडिक यांच्या धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. हे कार्यकर्ते आज प्रवेश करणार नसले तरी, त्यांनी सभा स्थळी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain interrupt bjp solapur rally home minister amit shah mega bharti