
हद्दवाढ आजू-बाजूच्या गावांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही असेही ते म्हणाले.
'कोल्हापुरातील मविआ नेत्यांचा कारभार म्हणजे डबल ढोलकी'
कोल्हापूर: कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यांचे प्रकाशन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीकास्त्र सोडले. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कारभार म्हणजे डबल ढोलकी अशी टीका त्यांनी केली आहे.
कोल्हापूरच्या निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन होताच चंद्रकांतदादांनी विकासाचा आराखडा वाचला. यावेळी ते म्हणाले, कोल्हापूरमध्ये विकासाच्या दृष्टीने काही खेळांच्या मैदानांचा विकास करणार असून, पंचगंगा प्रदूषण कमी करण्यासाठी पाठपुरावा तसेच आरोग्य सुविधा बळकट करणार असल्याचे सांगितले. पर्यटकांसाठी संकुल उभे करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
हेही वाचा: आज वक्त तुम्हारा है,कल हमारा होगा ; भुजबळांचा शायरीतून भाजपला इशारा
कोल्हापुरच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले, निवडणूका जवळ आल्या की यांची नाटकी सुरु होतात. हरण्याची भिती असल्याने हद्दवाढीचा मुद्दा, थेट पाईपलाईनचा मुद्दा, पाच गावे हद्दवाढ करणार असल्याचे सांगत आहेत. पण हद्दवाढ आजू-बाजूच्या गावांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही असेही ते म्हणाले.
सत्यजित कदम निवडून आल्यानंतर गावोगावी सत्काराचे कार्यक्रम न करता दिल्लीला जातील. त्यानंतर विकासाची राहिलेली कामे करण्याच्या ते मागे लागतील. त्यानंतर धनंजय महाडिक यांनाही दिल्लीला पाठवणार असल्याचेही ते म्हणाले.
Web Title: Chandrakant Patil Criticism On Mahavikas Aghadi Kolhapur North Election 2022 Political
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..