आज वक्त तुम्हारा है,कल हमारा होगा ; भुजबळांचा शायरीतून भाजपला इशारा

एकमेकांचे पाय ओढण्याची काम करू नका -छगन भुजबळ
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal

वेगवेगळ्या नेत्यांवर अटॅक करायचा, घरदार उद्ध्वस्त करायचं तुम्ही आम्ही स्वातंत्र्य कशासाठी मिळवलं. इंग्रजांच्या काळामध्ये काही प्रमाणात न्याय मिळायचा पण आता काय चाललंय असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. वक्त बहुत कुछ दिखा देता है, आज वक्त तुम्हारा है, कल हमारा होगा असा शायरीतून इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपाला (BJP) दिला.

ते पुढे म्हणाले, राजकारणाच्या मैदानात लढण्याऐवजी जनतेच्या कोर्टात लढा. या स्वराज्यात जनता सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही जरी चुकलो आमचे जरी सरकार गेले असले तरी पवार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आम्ही परत आलो. महाविकासआघाडी सेवाभावी वृत्तीने काम करत आहे यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. एकमेकांचे पाय ओढण्याची काम करू नका असा इशारा त्यांनी दिला.

Chhagan Bhujbal
कानाचे दडे बसतील आता तयारी ठेवा; चित्रा वाघ यांचा इशारा

मविआ नेत्यांवर कितीही कारवाई करा घाबरत नाही. भाजपापासून या देशाला कसं वाचवायचं याचा विचार करा धर्माच्या संकटातून बाहेर पडायचा आहे. यासाठी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार या देशाला वाचवू शकतात असेही ते म्हणाले.

Chhagan Bhujbal
मुंबईच्या एसीमध्ये बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दुष्काळाची झळ नाही-सदाभाऊ खोत

आपले कोण दुसरे कोण आहे ओळखा. आपापसात भांडण करू नका, पक्षासमोर अडचणी वाढवू नका एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. मदत करा, प्रेमाने जवळ घ्या. तुम्ही जी काही दादागिरी सुरू केली आहे ती बंद करा वक्त बदल जायेगा, आज तुम्हारा है कल मेरा आयेगा l जमाना जानता है किसी के बाप से डरते नही असा शायरीवजा टोला त्यांनी भाजपला लगावला.

काय म्हणाले भूजबळ शायरातून

वक्त दिखाई नही देता मगर बहुत कुछ दिखा देता है, अपनापन तो हर कोई दिखता है, पर अपना कौन है, ये वक्त आने पर पता चलता है, आज वक्त तुम्हारा है कल हमारा होगा l

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com