'1993 ला बाळासाहेबांमुळे हिंदू जिवंत, त्यांचे वारसदार मात्र भूमिकाहिन' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

त्रिपुराच्या घटनेमध्ये भाजपचा हात असेल तर अमरावती आणि इतर जिल्ह्यात झालेल्या दंगलीमध्ये संजय राऊत यांचा हात आहे का?

'1993 ला बाळासाहेबांमुळे हिंदू जिवंत, त्यांचे वारसदार मात्र भूमिकाहिन'

पुणे - १९९३ साली मुंबईत घडलेल्या दंगलीमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोटचेपी भूमिका घेतली नाही म्हणूनच मुंबईतील हिंदू जिवंत राहिला. परवा त्रिपुरातील कथित घटनेवरून घडलेल्या घटनांवर बाळासाहेबांचे वारसदार मात्र कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत हे धक्कादायक आहे, अशी खोचक टीका भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते पुणे येथे बोलत होते.

हेही वाचा: जयंतरावांचा अश्‍वमेध पुन्हा एकदा रणांगणात

यावेळी त्रिपुरातील घटनेसंबंधी भाजपवर होत असलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हे अजून समोर आलेले नाही. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आणि या घटनेची प्रतिक्रीया अमरावतीमध्ये उमटते. १५ ते २० हजार लोकांसह रस्त्यावर उतरायचं आणि माजी मंत्री जगदीश गुप्तांच्या दुकानांची तोडफोड करायची हा कोणता मेळ आहे. जर त्रिपुराच्या घटनेमध्ये भाजपचा हात असेल तर अमरावती आणि इतर जिल्ह्यात झालेल्या दंगलीमध्ये संजय राऊत यांचा हात आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, खऱ्या खरं म्हणायला आम्ही घाबरत नाही. ज्याप्रमाणे आम्ही संघाचे स्वयंसेवक तसेच बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणारेही आहोत. त्यांनी हेच शिकवले आहे. १९९३ साली मुंबईत घडलेल्या दंगलीमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोटचेपी भूमिका घेतली नाही म्हणूनच मुंबईतील हिंदू जिवंत राहिला नसता. त्या शिवसेनेचे वारसदार जर या घटनेवर काही बोलणार नाहीत. मात्र काल घडलेल्या घटनेमध्ये भाजपाचा हात आहे असा आरोप करत आहेत. या सरकारला कोणतीही संवेदनशीलता राहिलेली नाही. लाखो एसटी कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. हे सरकार प्रतिष्ठेचा विषय धरून बसले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात येत असणाऱ्या अडचणी सुटेपर्यंत 'जे शासकीय कर्मचाऱ्यांना, तेच एसटी कर्मचाऱ्यांना' हे धोरण राबवा! असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचा: इतिहासात भाजपचे प्रथमच स्वतंत्र पॅनेल

loading image
go to top