
'...निर्लज्जम् सदा सुखी!'; चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारला चिमटा
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh Case) यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश देत महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला, यावरुन भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मविआ सरकार म्हणजे निर्लज्जम् सदा सुखी म्हणत न्यायव्यवस्थेने मविआ सरकारला दोनदा सनसनाटी चपराक लगावली, असे म्हटले आहे.
याआधी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, सध्याच्या वातावरणात न्यायालयांकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचं विधान राऊतांनी यावेळी केलं होतं, यावर त्यांच्या नावाचा उल्लेख टाळत फटकारले होते संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा अप्रत्यक्ष दाखला देत जोरदार टीका केली.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना खंडपीठाने संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली. त्यांनी “प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची आम्हाला चिंता वाटत नाही. परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की आता त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. आम्ही हे वाचलं, पण या गोष्टींमुळे आम्हाला काही फरक पडत नाही. अशा वक्तव्यांची जागा आमच्यासाठी केराची टोपली आहे”, असे म्हणत कोर्टाने संजय राऊतांना सुनावलं होतं. आज यावर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारला चिमटा काढला आहे.
हेही वाचा: परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे सर्व प्रकरणे CBI कडे द्या; SC चे आदेश
पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याचे कोर्टाने निर्देश दिल्यानंतर, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या दोन्हींचा संदर्भ देत एक ट्विट केलं आहे , त्यामध्ये त्यांनी "मविआ सरकार म्हणजे निर्लज्जम् सदा सुखी! आजच्या दिवसात न्यायव्यवस्थेने अशाप्रकारे मविआ सरकारला दोनदा सनसनाटी चपराक लगावली! न्यायव्यवस्थेकडून वारंवार चपराक लगावून घेण्याची या सरकारला सवय झाली आहे." असे म्हटले आहे.
हेही वाचा: जिवंत जाळण्यापूर्वी लोकांना बेदम मारहाण; शवविच्छेदन अहवालात खुलासा
Web Title: Chandrakant Patil On Mva Government After Sc Transferred Parambir Singh All Cases To Cbi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..