Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackerayesakal

Shivsena News: न्यायालयाच्या निकालानंतर होणार मोठी उलथापालथ; भाजपच्या क्रमांक दोनच्या नेत्याच्या विधानाने खळबळ

Shivsena News: राज्यात सत्तांतर झाल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात येत आहे.

त्यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे भाजपचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Rahul Gandhi : काँग्रेस लिडरशिपचा देशातील जनतेवर काहीच प्रभाव नाही; पूर्वाश्रमीच्या नेत्याची टीका

चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्वाचं मोठं नुकसान करत आहेत. त्यामुळे सर्वकाही थांबलं पाहिजे. त्यात मी असा विचार व्यक्त करणं की, शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येणे, त्याची चर्चा होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होईल, असही पाटील म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान अनेकजण काठावर आहेत. ते सर्वजन कोर्टाचा निकाल लागण्याची प्रतीक्षा करत आहेत, असा दावाही पाटील यांनी केला आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Rupali Patil: "जनताच तुम्हाला गोमुत्र पाजून लायकी दाखवेल"; रुपाली पाटील 'त्या' घटनेवर भडकल्या

शिंदे गटाचा लोकांना मोदींचा आशीर्वाद आणि फायदा होणार आहेच. पण महाराष्ट्रातील परिस्थिती कधी नव्हे इतकी fluid झाली आहे. सतत बदलणारी. त्यामुळे आता जागावाटप ठरवता येणार नाही. आता शिरूरच काय करायचं कसं ठरवणार.

समजा उदाहरण म्हणून कोल्हेना वाटलं की आपण भाजप मध्ये जावे तर त्यांनी शिंदे का भाजप कडून कोणाकडून लढायचे ते ठरवावे लागेल. लोकसभा डिसेंबर-जानेवारी आणि विधानसभा लोकसभेनंतर सुरू होईल, असंही पाटील यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com