''मविआनं खोटी माहिती देण्यासाठी इको सिस्टिम तयार केलीयं''

राज ठाकरे भाजपाची बी-टीम ही खोटी माहिती पसरवली जात आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sakal

कोल्हापूर : राज ठाकरे (Raj Thackeray)भाजपाची बी-टीम ही खोटी माहिती पसरवली जात आहे. ते स्वतंत्र आहेत. त्यांनी जो हिंदुत्वाचा मुद्दा मांडला आहे तो आरएसएसच्या जन्मापासूनचा आहे. मविआनं खोटी माहिती देण्यासाठी इको सिस्टिम तयार केलीयं असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.

Chandrakant Patil
'मदतीच्या नावाखाली चित्रा वाघ राजकीय पोळी भाजून घेतात'

राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणानंतर राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. यावर आता नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या पाडव्याच्या मेळाव्यानंतर भाजपाची बी-टीम आहे असं महाविकास आघाडीने सांगण्यास सुरुवात केली. मात्र याला राज यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांची काही धोरण पटली नाही म्हणून मी त्यांच्यावर टीका केली. जे-जे चुकतात त्यांच्याविषयी मी टीका करतो असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीने खोटं बोलून जनतेपर्यंत इको सिस्टिम निर्माण केली आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) ठाण्यातून , अजित पवार (Ajit Pawar) पुण्यातून सेम बोलतात यामुळे इको तयार होतो. यामध्ये आता आदित्य ठाकरे देखील आले आहेत असा टोलाही लगावला.

Chandrakant Patil
राज ठाकरेंच्या भेटीत काय झाली चर्चा? भाजपचे कृपाशंकर सिंह म्हणतात...

पुढे ते म्हणाले, हिंदुत्वाचा मुद्दा एेरणीवर आला आहे. भाजपाला तो नव्याने घ्यावा लागणार नाही. कारण हिंदुत्व हा भाजपाचा श्वास, आत्मा आहे. १९२५ सालापासून हिंदुत्वाचा मुद्दा आरएसएस (RSS) मांडतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत.

एकमेकांच्या धर्माबद्दल आदर केला पाहिजे. धर्माचा आदर करताना धर्म थोपवण्याची आवश्यक्यता नाही.राज ठाकरेंच्या अल्टिमेटमचे परिणाम काय होतील हे सरकारनं पाहावं. '३ मे'नंतरच्या परिणामांची जबाबदारी सरकारची आहे असेही ते म्हणाले.

Chandrakant Patil
DGCA ने 90 पायलटला बोइंग 737 मॅक्स उड्डाण करण्यापासून रोखलं

राजकारणात यश मिळवण्यासाठी सकारात्मक मुद्दे मांडायचे असतात. समाजाचं विभाजन करणं हे राजकीय स्वार्थासाठी बरोबर नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी असावे असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com