Chandrakant Patil l शरद पवारांनी आपली टुकडे-टुकडे गँग आवरावी - चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil,sharad pawar

पुरोगामीत्वाचा आव आणायचा आणि प्रत्यक्षात विविध सामाजिक वर्गांतील दुर्बल घटकांना लक्ष्य करून आपली मग्रुरी दाखवायची ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पद्धत आहे

पवारांनी आपली टुकडे-टुकडे गँग आवरावी - चंद्रकांत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना समाजातील विविध घटकांमध्ये भांडणे लावून समाजाचे तुकडे तुकडे करण्यातच रस आहे. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची हिंदू पुरोहितांवरची टीका हे त्याचे ताजे उदाहरण आहे. पक्षाची ही टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी (Sharad Pawar) आवरावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील(Chandrakant Patil) यांनी आज येथे केले.

हेही वाचा: Photo l ‘पुन्हा साथ देऊया... चला, पंचगंगा वाचवूया’; जलदिंडीद्वारे प्रदूषणमुक्तीला प्रारंभ

राष्ट्रवादी काँग्रेसचे मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाल्याप्रकरणी पाटील बोलत होते. समाजातील एकेका घटकाला लक्ष्य करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. ही राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी आवरावी, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: 'भोंगा' चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण होताच किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

हिंदू पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अन्यधर्मीय धर्मगुरुंची टिंगल करायची हिंमत होत नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार आस्तिक आहेत की नास्तिक आहेत हे माहिती नाही. पण त्यांच्या पक्षाचे नेते आवर्जून हिंदू पुरोहितांची टिंगल करतात हे मात्र सर्वांना दिसते. मिटकरी व्यासपीठावरून पुरोहितांची टिंगल करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे हे जोरात खिदळून चिथावणी देत होते. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला हे शोभते का हे त्यांनीच सांगावे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसला अन्य कोणत्याही समाजघटकाबद्दल आस्था नाही. महाराष्ट्रात सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. आणि २०१९ मध्ये सत्ता मिळविल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालविले. याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या बेफिकीरीमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. दलित-आदिवासींच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा घोळही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीनेच केला, अशीही टीका पाटील यांनी केली.

Web Title: Chandrakant Patil Reaction On Amol Mitkari Speech Sharad Pawar Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top