Tanaji Sawant म्हटलं की... वादग्रस्त वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil reaction Tanaji Sawant Controversial Statement About Maratha Reservation

Tanaji Sawant म्हटलं की... वादग्रस्त वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'तानाजी सावंत यांनी एखाद्या वाक्य म्हटलं की त्याची तोडमोड करून ते समोर आणलं जातं. सावंतांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला' असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. (chandrakant patil reaction Tanaji Sawant Controversial Statement About Maratha Reservation)

राज्यात सत्तांतर होताच लगेच तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले. त्यांच्या या विधानानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तानाजी सावंत यांनी एखाद्या वाक्य म्हटलं की त्याची तोडमोड करून ते समोर आणलं जातं. त्यातला ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याचा आमच्या रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत नेहमी हेच होतं.

पण, ग्रामीण भागातल्या लोकांना विचारलं की ते म्हणतात, यात काय आहे तानाजी सावंतांना एवढेच म्हणायचं होतं की, मराठा समाजाला आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्रजी यांनी दिलं म्हणजे बीजेपी सरकारने दिलं ते हायकोर्टात टिकवलं ते सुप्रीम कोर्टात एक वर्ष टिकवलं मग अडीच वर्षात आंदोलन का केली नाही ? असं तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा अर्थ असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तानाजी सावंत यांनी नेमंक म्हटल होत काय?

मराठा समाजाकडून आम्हाला ओबीसी किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. या सगळ्यामागचा कर्ता करविता कोण आहे, हे तुम्हा-आम्हाला समजणे गरजेचे आहे. सगळ्यांना याबाबत माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला असून त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.