'गिरणी कामगाराचा मुलगा प्रगती करतो हे सतेज पाटलांना बघवत नाही'

सतेज पाटलांना माझी प्रगती बघवत नाही, त्यामुळं... - चंद्रकांत पाटील
Politics
PoliticsGoogle
Summary

सतेज पाटलांना माझी प्रगती बघवत नाही, त्यामुळं... - चंद्रकांत पाटील

सध्या कोल्हापुरात निवडणुकीचे वारे वाहत आहे. कोल्हापूर उत्तरसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीने कंबर कसली असून उमेदवारांसह कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहेत. या दोन्ही राजकीय गटातील दिग्गज नेत्यांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chndrakant Patil) यांनी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना टोमणा मारला आहे. पालकमंत्री पाटील यांना माझी प्रगती बघवत नाही, एका गिरणीकामगाराचा मुलगा इतकी प्रगती करतो हे त्यांना बघवत नाही असे म्हणत त्यांनी चिमटा काढला आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते.

Politics
'तुंबलेल्या मोरीतून काहीतर निघेल वाटलं, पण हे तर भाजपचं...'

यावळे चंद्राकंत पाटील म्हणाले, सतेज पाटील आणि महाविकास आघाडीतील काही नेते हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. इतके सगळे असूनही सतेज पाटील यांना कॅबिनेट मंत्री होता आले नाही. काँग्रेसचे राज्य अध्यक्षही ते झाले नाहीत. ते महापालिका, जिल्हा परिषद यामध्येच रमले आहेत. एका गिरणीकामगाराचा मुलगा इतकी प्रगती करतो हे त्यांना बघवत नाही. म्हणून ते माझ्यावर कोल्हापुरातून पळून गेलो अशी टीका करतात. आमच्या पक्षात नेत्याच्या आज्ञेला महत्त्व आहे. त्यामुळे कोथरूडमधून निवडणूक लढवली. विकास कामांच्या चर्चेसाठी कधीही बिंदू चौकात यायला तयार आहे, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, काल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यानिमित्त शिवतीर्थ येथे भाषण केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. यावर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र 'मी धर्मांध नाही पण धर्माभिमानी आहे.' ही राज ठाकरे यांची भूमिका सर्वसामान्य हिंदूला आनंद देणारी आहे. राज यांच्या भाषणामुळे हिंदूह्रृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. मुसलमानांचे लांगुलचालन नको त्यांचा आदर केला पाहीजे. हेच मुद्दे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मांडले असल्याचेही ते म्हणाले आहेत.

Politics
'ऐन निवडणुकीत Paytm वर हजार रुपये येणार, आता ED चौकशी लावणार'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com