चंद्रपूर @ 46; देशातील उच्चांकी तापमान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

पुणे (प्रतिनिधी) : उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाड्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे ४६.० अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी अजून काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. तसेच मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्यावर राहून उन्हाचा चटका कायम राहील. कोकणातही उन्हाची तीव्रता ही कायम राहणार आहे. 

सध्या राजस्थानपासून ते मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर लक्षद्वीप आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. येत्या मंगळवार (ता. १५)पर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

शुक्रवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :
मुंबई ३४.०, सांताक्रूझ ३३.६, रत्नागिरी ३४.०, डहाणू ३५.९, पुणे ४०.८, नगर ४३.२, मालेगाव ४४.६, नाशिक ४१.१, सातारा ३९.७, सोलापूर ४२.२, औरंगाबाद ४१.५, परभणी शहर ४२.७, अकोला ४४.८, अमरावती ४३.४, बुलडाणा ४२.०, ब्रह्मपुरी ४४.७, चंद्रपूर ४६.०, गोंदिया ४३.०, नागपूर ४५.०, वर्धा ४५.०, यवतमाळ ४३.२. 

Web Title: Chandrapur hottest in the country