चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

भाजपनं ट्वीट करुन याची माहिती दिली.
Chandrasekhar Bavankule
Chandrasekhar Bavankulesakal
Updated on

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानं हे पद रिक्त झालं होतं, त्याजागी आता बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा भाजपकडून लवकरच करण्यात येणार आहे. (Chandrasekhar Bawankule BJPs new Maharashtra state president)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तर आमदार आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं आहे. या दोन्ही नियुक्त्या तत्काळ प्रभावानं लागू करण्यात आल्या आहेत.

Chandrasekhar Bavankule
पंकजा मुंडे यांना भविष्यात मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत

भाजपनं प्रदेश भाजप कार्यकारिणीत खांदेपालट केले आहेत. त्यानुसार, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद देण्यात आल्यानं ही जबाबदारी बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे.

Chandrasekhar Bavankule
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ७५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे, मुख्यमंत्री आघाडीवर

दरम्यान, नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, "माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिल्यानं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपच्या संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाचं तसेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या जबाबदारीतून पुढच्या काळात मला सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील नंबर वन पक्ष असलेला भाजप आणखी पुढे कसा नेता येईल तसेच शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचवता येईल, याचा प्रयत्न करणार. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचंड ताकदीनं पक्ष उभा करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. गेल्या २९ वर्षात पक्षानं माझ्यावर जी जबाबदारी दिली होती तो विश्वास मी सार्थ करुन दाखवीन"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com