

BJP leader Chandrashekhar Bawankule appointed as Maharashtra election in-charge for upcoming local body polls, marking a major strategic move by the party
BJP leader Chandrashekhar Bawankule News : बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान आज संपले आणि आता सर्वांना निकालाचे वेध लागले आहेत. तर इकडे महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भाजपने मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राज्यातील आगामी निवडणुकासांठी निवडणूक प्रभारी पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. चंद्रशेखऱ बावनकुळे यांचा संघटनात्मक अनुभव आणि काम करण्याची पद्धत पाहता भाजपला या निर्णयाचा आगामी काळात फायदा होईल, अशाही चर्चा आहेत.
भाजपच्या या निर्णयाबाबत स्वत: चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी मीडियाला माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माझ्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. या निवडणुकीचा प्रभारी म्हणून मी कामकाजात सहकार्य करावं, अशी भूमिका रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.''
तसेच ''आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये आमच्या संपूर्ण टीमने सहकार्य करावं. या टीमच्या आणि महायुतीच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्यासाठी आणि आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढण्यासाठी निवडणूक प्रभारी म्हणून माझ्याकडे प्रदेशाध्य रवींद्र चव्हाण यांनी जबाबदारी दिलेली आहे.'' असंही बावनकुळे म्हणाले.
याशिवाय, ''मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. निश्चितपणे महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून आम्ही दोन तृतीयांश बहुमताने सर्व निवडणुका जिंकू. राज्यातील सर्व महापालिका, जिल्हापरिषदा, नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये भाजप महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा मला विश्वास आहे.'' अशी प्रतिक्रिया मीडियाल बावनकुळे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.