Bihar Election 2025 EXIT POLL : बिहारमध्ये मतदान संपताच ‘EXIT POLL’चे निकाल जाहीर; जाणून घ्या, ‘एक्झिट पोल’नुसार कुणाची येणार सत्ता?

Bihar Assembly Election Exit Poll : दोन टप्प्यांमध्ये बिहारमधील विधानसभेच्या एकूण २४३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. बहुमताचा आकडा हा १२२ आहे.
Bihar Assembly Election Exit Poll results are out

Bihar Assembly Election Exit Poll results are out

election

Updated on

Bihar Assembly Election Exit Poll Results Declared : बिहारमध्ये आज(मंगळवार) विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. दोन टप्प्यांमध्ये बिहारमधील विधानसभेच्या एकूण २४३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. बहुमताचा आकडा हा १२२ आहे.

यंदा बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही टप्प्यांत विक्रमी मतदान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता राज्यात नेमकी सत्ता कुणाची येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच काही वेळात बिहार निवडणुकीबाबत विविध एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले.

एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांचेच म्हणजे एनडीए आघाडीचे सरकार येत आहे. तर महाआघाडीला सत्ता मिळवण्यात अपयश आल्याचे एक्झिटपोलचे आकडे सांगत आहेत. यानंतर आता सर्वत्र चर्चांना उधाण आलेलं आहे. एऩडीए आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर विरोधी पक्षांकडून ही आकडेवारी नक्कीच बदलेली निकालात दिसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Bihar Assembly Election Exit Poll results are out
Bihar Election Record Break Voting : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात नोंदवला गेला मतदानाचा नवा रेकॉर्ड ; आता सर्वांनाच प्रतीक्षा निकालाची!

बिहार निवडणुकीबाबत विविध एक्झिट पोलची आकडेवारी –

चाणक्य – एनडीए -१३०-१३८, महाआघाडी – १००-१०८, इतर ०३-०५

चाणक्य – भाजप- ७०-७५, जेडीयू– ५२-५७, एलजेपी-१४-१९, काँग्रेस-१७-२३, राजद-७५-८०, जेएसपी-०५

पोलस्ट्राट – एनडीए – १३३ -१४८, महाआघाडी – ८७-१०२, इतर -०३-०५

पोलस्ट्राट – भाजप- ६८-७२, जेडीयू – ५५-६०, एलजेपी-०९-१२, काँग्रेस -०९-१३, राजद-६५-७२, जेएसपी-०५

Bihar Assembly Election Exit Poll results are out
Shaheen Shaheed Arrest : दिल्ली बॉम्बस्फोटाबाबत नवीन खुलासा; मसूद अझहरच्या बहिणीच्या संपर्कात होती ‘शाहीन’

मेटराइस –

एनडीए – १४७-१६७, महाआघाडी- ७०-९०, जेएसपी-०२, इतर-०५

 पीपल पल्स –

एनडीए – १३३-१५९, महाआघाडी- ७५-१०१, जेएसपी-०५, इतर-०२-०८

 भास्कर रिपोर्ट –

एनडीए – १४५-१६०, महाआघाडी- ७३-९१, जेएसपी-००, इतर-०५-१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com