

Chandrashekhar Bawankule
esakal
मुंबई : राज्यात काही दुष्काळी तालुक्यांत प्रलंबित वीजबिलांमुळे किंवा रोहित्रांअभावी (ट्रान्सफॉर्मर) बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्यात याव्यात. तसेच टँकर हा अंतिम पर्याय ठेवावा. त्यापूर्वी सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री तथा दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. दुष्काळ आढावा बैठकीत ते बोलत होते.