Chandrashekhar Bawankule : ...म्हणून मी 'औरंगजेबजी' म्हणालो ; राऊतांच्या रोखठोकनंतर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut
Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut

Chandrashekhar Bawankule : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोक मधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबचा, औरंगजेबजी असा उल्लेख केला होता. त्यानंतर विरोधकांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी देखील त्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानावर गप्प बसणारे छत्रपती संभाजीराजेंच्या कथित अपमानावर अजित पवारांच्या विरोधात रान उठवत आहेत. औरंगजेब क्रूर नव्हता, असा साक्षात्कार राष्ट्रवादीच्या एका आमदारास याच वेळी झाला व औरंगजेबजी हे सन्माननीय आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांना पटले. महाराष्ट्रातील धार्मिक गोंधळाचा हा नवा इतिहास आहे, असे राऊत म्हणाले. राऊतांच्या रोखठोकवर

"क्रूरकर्मा, पापी औरंग्या जितेंद्र आव्हाड यांना कसा आदरणीय आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेणारा औरंग्या किती नीच, क्रूर, दुष्ट, अमानुष आहे. तरी आव्हाड औरंग्याला शुद्धतेचे प्रमाणपत्र देतात. याची कीव आली म्हणूनच मी पापी औरंग्या आव्हाडांना किती प्रिय, आपुलकीचा व श्रद्धास्थानी आहे हे सांगण्यासाठी, औरंग्या आव्हाडांसाठी 'औरंगजेबजी ' आहे, असे मी उपरोधाने म्हणालो. उपरोधही समजू नये, हे अनाकलनीय व दुर्दैवी आहे. त्या औरंग्याला मी स्वप्नातही 'जी' म्हणू शकत नाही. हे पुन्हा सांगतो आणि आयुष्यभर सांगेन," असे बावनकुळे यांनी स्पष्ट कले.

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut
Mumbai News : मुंबईत 1993 सारखा बॉम्बस्फोट होईल, पोलीस कंट्रोलला आला फोन

बावनकुळे म्हणाले, औरंग्याने हिंदूंवर क्रूर अत्याचार केले. हिंदूंसाठी अतिशय कडक नियम केले. इस्लामच्या आधारे राज्यकारभार राबवून हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कर लादला. हिंदू रितीरिवाजांनुसार साजरे होणाऱ्या सणांवर त्याने बंदी घातली. त्याने हिंदूंवर जुलूम जबरदस्ती करत जिझिया कर लादला.जिझिया कर हा फक्त हिंदूंना भरावा लागत होता.

आज सामनाकारांनी आपले वर्तन व समज यापेक्षा वेगळी नाही हेही दाखवून दिले. आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा, असा समज पसरविण्याचा अनाठायी प्रयत्न केला, अशी टीका बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut
Ajit Pawar Visit Kolhapur : मुख्यमंत्री, पंतप्रधानही आता थेट जनतेतून निवडा - अजित पवार

बावनकुळे म्हणाले, "आम्ही आमच्या हिंदुत्ववाशी नाते घट्ट ठेवून आहोत. तुमचे काय ते तुम्ही दाखवून दिले आहे. पुन्हा सांगतो, औरंग्या धर्माधि होता. खुनशी, विश्वासघातकी, बदफैली, राक्षसी महत्वाकांक्षी आणि दुर्जन होता. तो आव्हाडांच्या प्रेरणास्थानी असू शकतो आणि सामनाकारांना त्याचे आकर्षण देखील वाटू शकते."

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut
Raj Thackeray : "तेव्हा सर्वांचा शहामृग झाला, पंतप्रधानांना हे शोभत नाही" ; राज ठाकरे असं का म्हणाले?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com