Raj Thackeray : "तेव्हा सर्वांचा शहामृग झाला, पंतप्रधानांना हे शोभत नाही" ; राज ठाकरे असं का म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray interview

Raj Thackeray : "तेव्हा सर्वांचा शहामृग झाला, पंतप्रधानांना हे शोभत नाही" ; राज ठाकरे असं का म्हणाले?

पुणे : जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्यातर्फे ‘शोध मराठी मनाचा’ हे १८ वे जागतिक मराठी संमेलन शुक्रवारपासून (ता. ६) पिंपरीत सुरू आहे. संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात हे संमेलन सुरु आहेत. (raj thackeray interview)

या संमेलनात मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे यांची आज मुलाखत घेण्यात आली. घटनेने संघ राज्याची चौकट तयार केली आहे. त्याच्यावर आघात करुन देशातील एकाच विशिष्ट राज्याला प्राधान्य देणे हे चुकीचे नाही का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, "मी हे आधी बोललो आहे. तेव्हा सर्वांचा शहामृग झाला होता. सगळ्यांनी माना आत घातल्या होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहीजे. देशातील प्रत्येक राज्य हे त्यांच्यासाठी समान मुलासारखे असले पाहीजे."

"आपण स्वत: गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्रधान्य देणे, हे एका पंतप्रधानाला शोभत नाही. मनमोहन सिंग पंजाबचे म्हणून सर्व पंजबाला, उद्या तामिळ पंतप्रधान होईल म्हणून सर्व तामिळनाडूला देईल, ही कुठची पद्धत आहे," असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: Raj Thackeray : राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले...

माझी २०१४ ची भाषणे काढून बघा. त्या भाषणात मी म्हटलं होतं. उद्या जर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तर त्यांनी पहिले पाच वर्षे उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावे. एखाद्या भूमिकेला विरोध करणे राजकारणात काही गैर नाही. पण त्या माणसाने चांगली गोष्ट केली तर त्याचे अभिनंदन करण्याता मोठेपणा आणि मोकळेपणा असावा लागतो, असे राज ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा: TMKOC: ‘तारक मेहता..’ होणार बंद? रिटा रिपोर्टर म्हणाली “शोचा टीआरपी…”

राजकारणावर राज ठाकरे म्हणाले, "राजकीय स्थिती एवढी लयाला गेली की हे राजकारण नव्हे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणं, महापुरुषांबद्दल बोलणं, कोणी कशावरही बोलायला लागल, कोणीही इतिहास तज्ज्ञ होत आहेत. कारण हे दाखवायला बसले आहेत. महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत. राणे काय बोलले, राऊत काय बोलले, हेच सुरू आहे. मी काहीही बोलत नाही. शरद पवार म्हणतात, मध्येच येतात आणि बोलतात. यामुळेच मी बोलत नाही."

हेही वाचा: Urfi Javed Controversy : सुप्रिया ताईंनाही राहावेना उर्फी जावेदच्या कपड्यांबद्दल म्हणाल्या....