Maharashtra Politics: "ठाकरेंचा सर्व वेळ पवार-काँग्रेसला संभाळण्यातच गेल्याने उद्योग हातातून गेले"

chandrashekhar bawankule on shivsena uddhav thackeray sharad pawar over project gone out of Maharashtra
chandrashekhar bawankule on shivsena uddhav thackeray sharad pawar over project gone out of Maharashtra file photo

मुंबई: राज्यातील उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे. यातच अजूनही उद्धव ठाकरे गटातील नेते शिंदे गटात सामील होत आहेत, यादरम्यान उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा सर्व काळ हा शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी देणेघेणे नव्हते, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा सर्व काळ हा शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी देणेघेणे नव्हते. ते बोलत नाहीत म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले तर त्यांच्या काळात उद्योजक महाराष्ट्राबाहेर का जाणार नाहीत? आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील चुकांमुळे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सांगली येथे केली. ते सांगली जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

chandrashekhar bawankule on shivsena uddhav thackeray sharad pawar over project gone out of Maharashtra
Blast On Railway Track: उदयपूर-अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर स्फोट! PM मोदींनी 13 दिवसांपूर्वी केलं होतं उद्घाटन

बावनकुळे म्हणाले की, राज्यात गुंतवणूक व्हायची असेल तर उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री अठरा महिने मंत्रालयात फिरकले नाहीत. वरिष्ठ सचिवांनाही मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्यासाठी वाट पहावी लागे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार यांना आणि काँग्रेस पक्षाला सांभाळण्यात जात होता. त्यांनी स्वतःला बंदिस्त केले होते. ते कोणाला बोलण्यासाठी उपलब्ध नव्हते.

chandrashekhar bawankule on shivsena uddhav thackeray sharad pawar over project gone out of Maharashtra
Honda EM1 e: शाळा-कॉलेजात जाण्यासाठी होंडाची परफेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर, काय आहे खास वाचा

तसेच बावनकुळे पुढे म्हणाले की, त्यांच्या काळात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका होत नव्हत्या, उद्योगांना जागा दिली जात नव्हती, करार होत नव्हते, पर्यावरण परवानग्या दिल्या जात नव्हत्या, उद्योजकांचे शंकानिरसन केले जात नव्हते. यामुळे महाविकास आघाडी सरकारमुळे एकेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com