Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंना भाजपने खरंच ऑफर दिली का? भाजप प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्टीकरण

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला दोनदा पराभव झाला, तरीदेखील मला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिली, असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता.
sushilkumar shinde
sushilkumar shindesakal

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला दोनदा पराभव झाला, तरीदेखील मला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिली, असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता. त्यानंतर आता भाजपकून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. परंतु आम्ही सुशीलकुमार यांना आणि प्रणिती शिंदे यांना ऑफर दिलेली नाही. माध्यमांमधून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत.

sushilkumar shinde
Rahul Narwekar: शिंदे गटामुळे राहुल नार्वेकर अडचणीत? मुंबई हायकोर्टाने पाठवली नोटीस

दरम्यान, बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली. ज्या काँग्रेसने प्रभू श्रीरामांना काल्पनिक म्हटलं आणि रामसेतू काल्पनिक असल्याचं प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलं, त्या काँग्रेसमध्ये आता काहीच उरलं नाही. त्यामुळे ज्यांना मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपमध्ये यायचं आहे, त्यांचं स्वागत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, पुढच्या काळात उद्धव ठाकरेंना उमेदवारसुद्धा मिळणार नाही, एवढी त्यांची वाईट अवस्था होईल. महाविकास आघाडीमधील घटकपक्षांवरदेखील हीच वेळ येणार आहे. महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. सोलापुरातही मोदींचं वादळ येणार आहे. महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

sushilkumar shinde
Kalsubai Record: अवघ्या ३८ मिनिट १४ सेकंदात कळसुबाई शिखर केले सर!

चंद्रकांत पाटील घेणार सुशीलकुमार शिंदेंची भेट

सोलापूर शहरातील नॉर्थकोट मैदानावर शंभरावे नाट्यसंम्मेलन होणार आहे. त्यानिमित्ताने निमंत्रण देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत. दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा होते का, हे बघावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com