शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावणार का ? चंद्रकांतदादांचा सवाल l Chandrkant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrkant Patil

शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावणार का ? चंद्रकांतदादांचा सवाल

कोल्हापूर : किराणा दुकानासह सुपर मार्केंटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देऊन सरकार शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावणार का ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकारांशी बोलताना केला.

सरकारने किराणा व सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्याला भाजपने विरोध केला असून या निर्णयाला विरोध करणारे शेतकरी विरोधात असल्याची टीका सरकारकडून होत आहे. या पार्श्‍वभुमीवर कोल्हापुरात आलेल्या पाटील यांना विषयी विचारले असता ते म्हणाले,‘शेतकऱ्यांचा पिकांना व फळांना पहिला भाव द्या मग याचा विचार करा. आजपर्यंत शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, गारपीटाने झालेल्या नुकसानीची भरपाई दिलेली नाही. तसेच कर्जमाफीसुध्दा अर्धवट ठेवली आहे. हे सगळे राहीले बाजूला आणि तुम्ही शेतकऱ्यांचे नांव पुढे करून किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देत आहात. शिवाय शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावायचे आहे का ?’(Cabinet approves sale of wine in supermarkets)

हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'मविआ'ला धक्का; चंद्रकांत पाटील

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या प्रश्‍नाबाबत विचारले असता ते म्हणाले,‘राज्यपाल हे राज्याचे सर्वोच्च पद आहे. त्यंनी मुद्दाम नियुक्ती थांबवली नाही. त्यांच्याकडे अधिकार असतात. तुम्हीच आता घटना मानत नाही. राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री तसेच न्यायाधीशांना सुध्दा राज्यपाल शपथ देत असतात, राऊत आपण त्यांना शपथ देत नाही असे म्हणत आपण त्यांना मान देत नाही.’

आघाडी सरकारला धक्का

भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. कृत्रिम बहुमताच्या आधारे मिळवलेली सत्ता आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात इतकी चढली होती की न्यायालयालाही धुडकावून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने ते वागत होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आघाडी सरकारला धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

डॉ. एन. डी. यांच्यासारखे नेतृत्त्व होणे नाही.

शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच डॉ. पाटील यांच्या पत्नी सरोज यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. पाटील यांच्यासारखे नेतृत्त्व होणे नाही असेही पाटील म्हणाले.

Web Title: Chandrkant Patil React Cabinet Approves Sale Of Wine In Supermarkets Kolhapur Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..