...म्हणून राणे, भुजबळांना शिवसेनेत शिंदेंसारखी फूट पाडता आली नाही; उद्धव ठाकरेंनी दिले उत्तर

शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे.
Changan Bhujbal Narayan Rane Raj Thackeray now Eknath Shinde Politics Uddhav Thackeray
Changan Bhujbal Narayan Rane Raj Thackeray now Eknath Shinde Politics Uddhav Thackerayesakal
Updated on

शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. शिवसेनेचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहता छगन भुजबळ, त्यानंतर नारायण राणे, त्यानंतर राज ठाकरे, गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत शिवसेनेत फूट पाडली. मात्र, भुजबळांना शिवसेनेत शिंदेंसारखी फूट पाडता आली नाही. यासंदर्भात सवाल संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना केला. (Changan Bhujbal Narayan Rane Raj Thackeray now Eknath Shinde Politics Uddhav Thackeray)

Changan Bhujbal Narayan Rane Raj Thackeray now Eknath Shinde Politics Uddhav Thackeray
मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

संजय राऊतांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

याचं कारण असं आहे की, ज्यांना मी अधिकार दिले होते त्यांनीच माझा विश्वासघात केला. त्यावेळी लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते, पण मला कुजबूज ऐकू यायची की, काय हे मुख्यमंत्री आहेत… नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे. मलईदार खातं आहे म्हणतात. पण मी ते खातं माझ्याकडे न ठेवता विश्वासाने त्यांच्याकडे सोपवलं होतं. मी मलई बिलई खाण्यासाठी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक म्हणजे सामान्य प्रशासन, दुसरे न्याय व विधी. होय, आयटीही ठेवलं, कारण खरंच या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का? हा माझा विचार होता.

असे उत्तर देत त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी केली आहे.

Changan Bhujbal Narayan Rane Raj Thackeray now Eknath Shinde Politics Uddhav Thackeray
साहेब’ जैसा जैसा बोले, हा तैसा तैसा चाले..उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची टीका

भाजप आणि शिवसेना यांच्यातील २०१४ ते २०१९ मधील युतीच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं. तर, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com