पारंपरिक शेतीची पद्धत बदला - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

बारामती - शेतीशिवाय अन्य क्षेत्रातूनही उत्पन्न मिळवता आले पाहिजे. त्यामुळे जगात होत असलेल्या बदलांबरोबर पारंपरिक शेतीची पद्धत बदलली पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शारदानगर येथे व्यक्त केले. 

शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअप्ससाठी निवडलेल्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी महाविद्यालयाच्या इनक्‍युबेशन व इनोव्हेशन सेंटरची पायाभरणी गुरुवारी इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. पीटर कार्बेरी, टाटा ट्रस्टचे वरिष्ठ सल्लागार डॉ. बर्जिस तारापोरवाला व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. 

या वेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार, विष्णुपंत हिंगणे, राजीव देशपांडे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, बायर कंपनीच्या सीएसआर विभागाचे प्रमुख सुहास जोशी आदी उपस्थित होते.

राजेंद्र पवार म्हणाले, ‘‘अप्पासाहेबांनी ‘सीईंग इज बिलिव्हिंग’ या तत्त्वावर भर दिला. त्यातूनच मिनीसोटा येथे अनुभवलेल्या कृषी प्रात्यक्षिकांच्या धर्तीवर कृषिक प्रदर्शनाची संकल्पना उभी राहिली. 

शेतकऱ्यांना हा शाश्वत शेतीचा मंत्र देण्यासाठी बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र सदैव तत्पर आहे. दुष्काळ सातत्याने येतो. अशावेळी सरकार सरकारचे काम करेल. मात्र, शेतकऱ्यांनी फक्त पारंपरिक शेती करून चालणार नाही, तर शेतीत बदल करावे लागतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनाही संशोधक व्हावे लागेल. यासाठीच इनक्‍युबेशन सेंटरची निर्मिती येथे होणार आहे.’’

बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे काम आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू लागले आहे. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून ज्ञान घेण्यासाठी शेतकरी येऊ लागले आहेत. कारण देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेतीत काम करते. येथे चांगली शेती केली पाहिजेच. 
- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

Web Title: Change the traditional farming method Sharad Pawar