esakal | राज्यातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल; वाचा सविस्तर

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जाचे शुल्क भरणे आणि अर्ज निश्‍चिती ‘ऑनलाईन’ होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत जावे लागणार नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत हा बदल करण्यात आला आहे.

राज्यातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल; वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जाचे शुल्क भरणे आणि अर्ज निश्‍चिती ‘ऑनलाईन’ होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत जावे लागणार नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत हा बदल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज निश्‍चितीच्या (कन्फर्मेशन) कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे, प्रवेश अर्ज निश्‍चितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) यापूर्वी जावे लागत होते. परंतु आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संबंधित शुल्क भरण्यासाठी ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा राज्य मंडळासमवेत सामंजस्य करार झाला असून त्याद्वारे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती संस्थेकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज करताना दहावीच्या परिक्षेचा आसनक्रमांक नमूद केल्यास त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप अर्जात नोंद होणार आहे. अन्य मंडळातून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना माहिती प्रवेश अर्जात द्यावी लागेल. 

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

प्रक्रिया बुधवारपासून
प्रवेशाची माहिती पुस्तिका, प्रवेश नियमावली, अर्ज व प्रवेश प्रक्रिया अशी प्रवेशाबाबत आवश्‍यक माहिती येत्या बुधवारपासून (ता. १५) उपलब्ध होणार आहे.

४१७ - राज्यात आयटीआय प्रशिक्षण संस्था
१ लाख - एकूण प्रवेशक्षमता

प्रवेशाबाबत महत्त्वाचे -

  • प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावे.
  • हे शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्‍चित होणार आहे. 
  • प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश निश्‍चितीसाठी संस्थेत येण्याची गरज नाही. 
  • प्रवेश अर्ज शुल्कानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत.
  • प्राथमिक गुणवत्ता यादीनंतर माहितीत बदलाची सुविधा ऑनलाईन.

Edited By - Prashant Patil