Maharashtra: धक्कादायक! उत्तरपत्रिकांत हस्ताक्षरामध्ये बदल, 552 विद्यार्थ्यांना बोर्डाने बजावल्या थेट नोटिसा

दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल तोंडावर असतानाच धक्कादायक माहिती समोर
Changes In Handwriting In Answer Sheets
Changes In Handwriting In Answer Sheets

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल तोंडावर असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षरांमध्ये बदल असल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी 552 विद्यार्थ्यांना बोर्डाने नोटिसा बजावल्या आहेत. (Changes In Handwriting In Answer Sheets )

उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षर बदल आणि कथित गैरप्रकारांवर बोर्डाच्या येथील कार्यालयात मंगळवारी सुनावणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी ८७ प्रकरणांत चौकशी समितीने विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले. यात विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांत अगदी मोजक्या प्रश्नांची जी उत्तरे लिहिली गेली आहेत ती इतर कुणीतरी नंतर लिहिली असल्याचा दावा केला.

Changes In Handwriting In Answer Sheets
Prithviraj Chavan : यापुढे राष्ट्रवादीविरोधात बोलणार नाही

हस्ताक्षर बदल असलेली ही प्रश्नांची उत्तरे एका ओळीत तर काही उत्तरपत्रिकांत फार तर तीन ओळी लिहिली गेली आहेत. या प्रकारामुळे आता निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

Changes In Handwriting In Answer Sheets
The Kerala Stroy चित्रपटाचा रामदास स्वामींशी खास संबंध.. अभिनेत्याचा Video व्हायरल

नेमकं काय घडलं?

फिजिक्सच्या उत्तरपत्रिकांत हा प्रकार मोठ्या प्रमाणात झाला आहे. चौकशीनंतर “या पान क्रमांकावर माझे हस्ताक्षर नाही’ असे विद्यार्थ्यांकडून पालकांच्या साक्षीने लिहून घेण्यात आले. विद्यार्थ्यांनुसार, काही उत्तरपत्रिकांत एका ओळीत हस्ताक्षर बदल होता तर काहींत तीन ओळीत.

विद्यार्थ्यांनी लेखीमध्ये हा प्रकार स्पष्ट नाकारल्याने एवढ्या उत्तरपत्रिकांत रिकाम्या जागी उत्तरे लिहिली कुणी, हा प्रश्न चौकशी समितीसमोर उभा ठाकला आहे.

कूण ५५२ उत्तरपत्रिकांबाबत ही सुनावणी होत असून ती ७ दिवस चालेल. याशिवाय दहावीच्या ७५ विद्यार्थ्यांनाही बोलावण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com