कोल्हापूरच्या अंबाबाई-जोतिबाच्या मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल; तासाला 400 भाविकांनाच प्रवेश l Covid 19 Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambabai, Jotiba Kolhapur

अंबाबाई-जोतिबाच्या मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल

कोल्हापूर: कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी आता तासाला केवळ चारशे भाविकांनाच ऑनलाईन बुकींग करून दर्शन मिळणार आहे. सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील. एकूण पंधरा तासात सहा हजार भाविकांना दर्शनाची सुविधा मिळणार आहे. याबाबतचा निर्णय आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नाईकवाडे (Shivraj Naikwade)यांनी जाहीर केला.

हेही वाचा: ZP,महानगरपालिकेच्या निवडणुकीत 'आमचं नवीन ठरलयं'; मंडलिकांचा इशारा

लॉकडाऊननंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर दर्शनासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला असून, सध्या तासाला पंधराशे भाविकांना ऑनलाईन बुकींग करून दर्शन घेता येत होते. पण, आता दिवसा जमावबंदी आणि एकूणच कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक झाल्याने दर्शनावर पुन्हा मर्यादा आणली गेली आहे.

नवरात्रोत्सवानंतर शहरात पर्यटनाच्या (Tourism)हंगामाला वेग आला. शनिवार, रविवार आणि सलग सुट्ट्यांच्या काळात रोज वीस ते चोवीस हजार भाविकांनी अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतले. मात्र, आता नव्या नियमानुसार तासाला चारशे भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. आजपासूनच या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top