ZP,महानगरपालिकेच्या निवडणुकीत 'आमचं नवीन ठरलयं'; मंडलिकांचा इशारा

शिवसेनेची सहकारात ताकद नसती तर आमचे सहा संचालक कसे झाले? खासदार मंडलिक
Satej Patil,Sanjay Mandlik
Satej Patil,Sanjay MandlikEsakal

कोल्हापूर : सहकारात काम करताना सर्वांशी अनेकांशी सबंध ठेवावे लागतात. पण, काहींना या मैत्रित काही दम नसल्याचे वाटू लागले आहे. लोकसभेच्या निवडणूकीत "आमचं ठरलयं' हे घोष वाक्‍य होते. यातून आम्ही बाजूला झालेलो नाही. पण, या जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीनंतर आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, बाजार समितीसह इतर निवडणूका लढवायचे हे "आमचं नवीन ठरलयं, हे लक्षात ठेवावे. हेच नवीन ठरलेले आम्ही टोकापर्यंत घेवून जाण्याचे काम भविष्यातील निवडूकांमध्ये करणार असल्याचा इशारा खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांनी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांचे नाव न घेतला दिला. तर, जिल्ह्यात शिवसेचे माजी आमदारांच्या नावापुढची "माजी' हा शब्द पूसुन काढण्यासाठी आतापासूनच जिल्हातील नियोजन करणार असल्याचा इशारा मंडलिक यांनी दिला.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेच्या निवडणूकीत (KDCC Bank Elections)विजयी झालेल्या शिवसेना प्रणित आघाडीच्या उमेदवारांचा सत्कार समारंभ येथील शासकीय विश्रामगृहात झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी संपर्कनेते अरूण दुधवडकर होते.

Satej Patil,Sanjay Mandlik
राज्यमंत्री यड्रावकरांसह 500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

खासदार मंडलिक म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीमुळे जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेने आम्हाला साथ दिली. हीच साथ जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, बाजार समितीच्या निवडणूकीत उपयोगाला येणार आहे. गोकुळमध्ये आमचे सहा संचालक शिवसेनेचे आहेत. शिवसेनेची सहकारात ताकद नसती तर आमचे सहा संचालक कसे झाले? असाही सवाल मंडलिक यांनी केला.

गोकुळमध्ये आमची ताकद आहे. पण जिल्हा बॅंकेत तुमची ताकद नाही, त्यामुळे तुम्ही दोनच जागा म्हणून आमची बोळवण केली गेली. आमची ताकद असतानाही आम्हाला तीन जागा दिल्या नाहीत. शिवसेनेसह शेकाप, आरपीआयचे कार्यकर्ते प्राणपणाने लढल्यामुळे हा विजय मिळाला असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले. यावेळी, संपर्कनेते अरुण दुधवकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजीत पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार सुरेश साळुखे, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मंजित माने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com